Monthly Archives: November 2024

Marathi Phrases, based on parts of the body

मराठी म्हणी ( शरीराच्या भागावरून)

 

डोके

  • डोके खाजवणे
  • डोके खाणे
  • डोके धरून बसणे
  • डोके चालणे वा न चालणे
  • डोके चालवणे
  • डोके दुखी होणे
  • डोके असणे वा डोके बाज असणे
  • डोक्याला ताप होणे

हात

  • हात देणे
  • हात दाखवणे
  • हातावर तुरी देणे
  • हातावर हात धरून बसणे
  • हात लावणे
  • हाताच्या कंकणाला आरसा कशाला
  • हात चालवणे
  • हात पाय मारणे
  • हातावर हात धरून बसणे
  • हात पाय मारणे
  • हात वर करणे
  • कोणावर हात टाकणे ( मारणे )

नाक

  • नाकदुर्या काढणे
  • सरळ नाकाने चालणे
  • नाक वर असणे
  • नाक मुठीत घेणे
  • नाकाने कांदे सोलणे
  • नाक मुरडणे
  • नाक खुपसणे
  • नाकाबर टिच्चून काही करणे 

कपाळ

  •  कपाळ समजणे ( म्हणजे काही न समजणे)
  • पांढर्या कपाळाची असणे
  • कपाळ मोक्ष होणे 
  • कपाळावर आठ्या असणे
  • कपाळावर हात मारणे
  • करंट्या कपाळाचा असणे
  • सटवाईने कपाळावर लिहीणे

ओठ

  • ओठ शिवणे
  • ओठातील बाब ओठातच राहणे
  • विषय ओठावर येणे (म्हणजे न सांगणे)

पाय

  • पायावर पाय देऊन उभे राहणे (म्हणजे रक्षा करणे)
  • पायाखालची जमीन सरकणे
  • पायावार हात ठेऊन बसणे
  • पांढर्या पायांची असणे      
  • पाय न निघणे
  • तंगड तोड करणे
  • तंगड्यात तंगडी अडकवणे

कान

  • कान देणे
  • कान देउन ऐकणे (म्हणजे चोरून ऐकणे )
  • कान टवकारणे
  • कानामागून येऊन तिखट होणे
  • कानात सांगणे (गुपीत ठेवणे)
  • कान उघडणे
  • कानावर हात ठेवणे (काही माहित नसल्याचा भाणा करणे)
  • कानावर येणे

डोळे

  • डोळे मोडणे
  • डोळ्याला डोळा न लागणे
  • डोळे वटारणे
  • डोल्याला डोळा न देणे
  • डोळे चोरणे
  • डोळे येणे

मान

  • मानगुटीवर बसणे
  • मान अडकणे
  • मान मोडून काम करणे

जीव

  • जीव जडणे
  • जीव लावणे
  • जीव देणे
  • जीव घेणे
  • जिवावर बेतणे
  • जीव ओवाळून टाकणे
  • जिवा शिवाची भेट होणे
  • जीव वर येणे
  • जीव स्वस्त / महाग होणे
  • जिवावर उदार होणे
  • जीव वर खाली होणे

तोंड

  • तोंड पडणे
  • तोंड पाडणे
  • तोडाला पाने पुसणे
  • तोंडचं पाणी पळणे
  • तोंडावर पडणे
  • तोंड देखलं बोलणे
  • तोंड वाजवणे
  • तोंड उघडणे
  • तोंड उघडायला लावणे